Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeदेश‘राहुल गांधींना सर्व देवांचा आशीर्वाद; २०१९ मध्ये बनणार पंतप्रधान’

‘राहुल गांधींना सर्व देवांचा आशीर्वाद; २०१९ मध्ये बनणार पंतप्रधान’

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्षपदाची निश्चिती झाल्यानंतर राहुल गांधी यांच्यावर आता शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाच्या बाहेर राहुल गांधी यांचे मोठे पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात आले आहेत. यामध्ये बरेचसे पोस्टर्स लक्षवेधी ठरले आहेत.

सर्व देव आशीर्वाद देत असलेल्या एका पोस्टरवर राहुल गांधींचे छायाचित्र लावण्यात आले आहे. यामध्ये लिहिले आहे की, राहुल गांधींना सर्व देवांनी आशीर्वाद दिला आहे. तसेच राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्षपदासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. तर दुसऱ्या एका पोस्टरमध्ये राहुल गांधी यांच्या छायाचित्रासह, २०१७ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष त्यानंतर २०१९ मध्ये भारताचे पंतप्रधान असे लिहिले आहे. हे फलक सर्वांचे लक्ष आकर्षित करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments