Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशएअरहोस्टेसची छेड काढणाऱ्या ६२ वर्षीय आजोबाला अटक!

एअरहोस्टेसची छेड काढणाऱ्या ६२ वर्षीय आजोबाला अटक!

Air Vistara, Pune, New Delhi

नवी दिल्ली – विस्तारा एअरलाइन्सचे विमान नवी दिल्लीत लॅन्ड होत असताना एका वृद्धाने एअरहोस्टेसशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील ६२ वर्षीय आरोपी मूळचा पुण्यातील असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना २४ मार्च रोजी लखनौहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात घडली आहे.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विस्तारा एअरलाइनने एका ६२ वर्षीय व्यक्तीवर आपल्या महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत. विस्तारा अशा प्रकारच्या वर्तनाच्या सक्त विरोधात आहे. आम्ही आमच्या स्टाफसोबत किंवा इतर कुठल्याही पॅसेंजरसोबत अशा प्रकारचा व्यवहार खपवून घेणार नाही. या घटनेची माहिती वेळीच पोलिसांना देण्यात आली असून आम्ही चौकशीला पूर्णपणे सहकार्य करत आहोत.

आरोपी पॅसेंजर पुण्यातील रहिवासी आहे. तो लखनौहून थेट नवी दिल्लीला जात होता. विस्तारा एअरलाइन्सच्या फ्लाइट यूके ९९७ मध्ये त्याने क्रू मेंबरशी अश्लील वर्तन केले. विमानाच्या लॅन्डिंगची तयारी सुरू असताना आरोपीने हा प्रकार केला. कंपनीने वेळीच पोलिसांत तक्रार दाखल केली. तसेच पोलिसांनी आरोपी व्यक्तीला विमानतळावरूनच अटक केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments