Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024
Homeदेशपराभूत धूमल यांना मुख्यमंत्री करण्यासाठी समर्थकांचा राडा

पराभूत धूमल यांना मुख्यमंत्री करण्यासाठी समर्थकांचा राडा

शिमला – हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्री पदावरुन चांगलेच वातावरण तापले आहे. गुरुवारी भाजप कोअर समितीच्या बैठकीसाठी निर्मला सितारामण आणि नरेंद्र तोमर हे शिमल्यात गेले होते. यावेळी धूमल आणि जयराम ठाकूर यांच्या समर्थकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. शुक्रवारीही धूमल समर्थकांनी दोघांच्याही गाड्या अडवून राडा केल्याने भाजपमधील गटबाजी समोर आली.

भाजपचे नवनिर्वाचित सदस्य आणि पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी सितारामण आणि तोमर हे दोघेही पर्यवेक्षक दिल्लीवरुन शिमल्यात गेले होते. यावेळी संघ कार्यालयात दीड तास बैठक घेतल्यानंतर सितारमण आणि तोमर हे पीटरहॉफमध्ये पोहोचले. यावेळी धूमल यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. धूमल यांनाच मुख्यमंत्री करण्यात यावे, यासह नवनिर्वाचित सदस्यांनाच मुख्यमंत्र्यांची निवड करु द्यावी अशीही मागणी यावेळी धूमल समर्थकांनी केली. बैठक पार पडल्यानंतर निर्मला सितारमण आणि नरेंद्र तोमर हे विरेंद्र कश्यप, शांता कुमार अनुराग ठाकूर आणि जे. पी. नड्डा यांना भेटणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री कोण असेल याची घोषणा दिल्लीतून करण्यात येईल, असे निर्मला सितारमण यांनी यावेळी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments