Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeदेशपोलिसांनी पंतप्रधान आणि राहुल गांधींच्या रोड शोला परवानगी नाकारली

पोलिसांनी पंतप्रधान आणि राहुल गांधींच्या रोड शोला परवानगी नाकारली

महत्वाचे..
१.अहमदाबादमधील रोड शो पोलिसांकडून रद्द २. मोदी आणि राहुल यांचा रोड शो झाल्यास सुरक्षेचा प्रश्न उद्भवू शकतो, असे पोलिसांनी म्हटले ३. हार्दिक पटेलच्या रोड शो ला परवानगी नाही


अहमदाबाद: गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाआधी प्रचाराचा धडाका लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजप आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरात पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या आज होणाऱ्या रोड शोजना परवानगी नाकारली आहे. मोदी आणि राहुल यांचा रोड शो झाल्यास सुरक्षेचा प्रश्न उद्भवू शकतो, असे पोलिसांनी म्हटले आहे. याशिवाय वाहतुकीचा खोळंबा होण्याचीदेखील शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांचा रोड शो आज गुजरातमध्ये होणार होता. मात्र या दोन रोड शोमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण शकतो, असे पोलिसांनी म्हटले आहे. मोदी आणि राहुल यांच्यासोबतच पाटिदार नेता हार्दिक पटेल यांच्या रोड शोलादेखील पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. ‘निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आम्ही रोड शोजना परवानगी नाकारली आहे. या रोड शोजमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. राजकीय पक्षांना सभा घेण्याची परवानगी आहे. मात्र कोणी रोड शो केल्यास, आम्ही कायदेशीर कारवाई करु,’ अशी माहिती अहमदाबादचे पोलीस आयुक्त ए. के. सिंह यांनी दिली.

विधानसभेच्या २१ जागा असलेल्या अहमदाबादमध्ये आज पंतप्रधान मोदी, राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांच्या रॅली होणार होत्या. मोदी २०१५ नंतर पहिल्यांदाच साबरमती रिव्हरफ्रंटवर सभेला संबोधित करणार होते. आज संध्याकाळी ८ वाजता ही रॅली आयोजित करण्यात येणार होती. अहमदाबाद शहरात विधानसभेच्या १६ जागा असून त्यातील १४ जागांवर भाजपचे आमदार आहेत. यंदा शहरातील सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवण्याचा भाजपता मानस आहे.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज संध्याकाळी अहमदाबादमधील विरमगाम भागात रोड शो करणार होते. पाटीदार नेते हार्दिक पटेल आणि ओबीसी नेते अल्पेश ठाकोर विरमगामचे आहेत. राहुल गांधी गांधीनगरमध्येही सभा घेणार आहेत. हार्दिक पटेल अहमदाबाद पश्चिम ते अहमदाबाद पूर्व असा रोड शो करणार आहेत. मात्र पोलिसांनी या रोड शोला परवानगी नाकारली आहे. हार्दिक पटेल यांचा रोड शो शहरातील ९७ भागांमधून जाणार होता. निकोलमध्ये सभा घेऊन हार्दिक पटेल या रोड शोची सांगता करणार होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments