Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeदेशपंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांसाठी केलं 'हे' ट्वीट

पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांसाठी केलं ‘हे’ ट्वीट

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यातील बोर्डाच्या, सीबीएससीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. विद्यार्थी परीक्षेच्य़ा तयारीला लागले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांसाठी आज गुरुवारी एक ट्वीट केलं आहे.

पंतप्रधान मोदींनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं की, परीक्षा जवळ आल्या आहेत आणि यासोबतच परीक्षा पे चर्चा सुद्धा. आपणाला एकत्र येऊन हे ठरवायला पाहिजे की परीक्षा तणावमुक्त व्हाव्यात. 9 वी पासून 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक अनोखी स्पर्धा आयोजित कऱण्यात आली आहे. यामध्ये विजेता ठरणाऱ्या विद्यार्थ्याला पुढच्या वर्षी होणाऱ्या ‘परीक्षा पे चर्चा’ 2020 मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

पंतप्रधानांनी सुरु केला होता हा कार्यक्रम…

परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम पंतप्रधान मोदींनी सुरू केला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्यांच्याशी परीक्षेबाबत चर्चा करतात. हा कार्यक्रम एकाच वेळी सर्वत्र प्रसारीत केला जातो.

2019 मध्येही परीक्षा पे चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना थेट संवाद साधण्याची संधी मिळाली होती. यात शिक्षक आणि विद्यार्थी यांना सहभागी होता येतं. यासाठी तुम्हाला केंद्र सरकारच्या mygov.in या संकेतस्थळावर जावं लागेल. इथं परीक्षा पे चर्चा अशा अधिकृत संकेतस्थळाची लिंक आहे. यावर जाताच सहभागी होण्यासाठी आवश्यक ती माहिती भरून स्पर्धेत भाग घेता येतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments