Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेशघबराट : करोना विषाणूमुळे १०६ मृत्यू!

घबराट : करोना विषाणूमुळे १०६ मृत्यू!

CoronaVirusनवी दिल्ली : जगभरात करोना विषाणूचीच चर्चा आहे. चीनमधून आलेल्या करोना विषाणूमुळे आतापर्यंत १०६ जणांचा मृत्यू झाला आहे. करोना व्हायरसची हजारो लोकांना लागण झाली असून, जगभरात घबराट पसरली आहे.

चीनमधील वुहान शहरातून करोना विषाणू जगभरात पसरला आहे. या संसर्गजन्य व्हायरसचे रुग्ण भारतातही आढळून आले असून, अद्याप कोणालाही याची लागण झाल्याचे प्रकरण समोर आलेले नाही. मात्र, नागरिकांच्या मनात सध्या तरी भीती निर्माण झाली आहे.

मुंबई, जयपूर, दिल्लीमध्ये रूग्ण आढळले पण् करोना व्हायरसची नाही…

मुंबई, जयपूर, दिल्ली या शहरांमध्ये करोना व्हायरसची लक्षणे असलेले रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण चीनमधून भारतात आले असून, या रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. परंतु कोणालाही करोना रोगाची लागण झाली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. देशातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आतापर्यंत ३५ हजार प्रवाशांची करोना चाचणी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

करोनामुळे प्रसंगी मृत्यू…

करोना विषाणूंचा धोका वाढल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. सामान्य सर्दी आणि करोना रोगाची लक्षणे सारखीच असल्यामुळे नागरिकांमध्ये जास्त घबराट पसरली आहे. करोना व्हायरस सुरुवातीला सामान्य सर्दीसारखा भासतो. मात्र, त्यानंतर श्वास घेण्यात अडचणी येतात. अंगदुखी वाढीस लागते, यावरून करोना रोगाची लागण झाल्याचे निदान होते. हा आजार बळावल्यामुळे निमोनिया, किडणी फेल यांसारखे भयंकर आजार होऊन प्रसंगी मृत्यूही ओढावू शकतो, अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

या देशात आढळले करोना रुग्ण…

चीनमधील वुहान शहरात करोना व्हायरसची सुरुवात झाली असून, वुहानमध्ये करोनाचे तब्बल २ हजार ७४४ रुग्ण आढळले आहेत. नेपाळ व कॅनडामध्ये एक, थायलँड, अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये ५, मलेशिया, सिंगापूर, दक्षिण कोरिया व जपानमध्ये प्रत्येकी ४, तायवान व फ्रान्समध्ये ३, व्हिएतनाममध्ये २ करोना रुग्ण आढळले आहेत.

ही आहेत करोना आजाराची लक्षणे…

सर्दी, खोकला,  तीव्र ताप, अंगदुखी श्वास घ्यायला त्रास होणे, न्यूमोनिया, अतिसार व अवयव निकामी होणे,  प्रतिकारशक्ती कमी होणे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments