Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेशगुढ उकलले: आहेरात ‘पार्सल बॉम्ब’, नवऱ्याचा मृत्यू!

गुढ उकलले: आहेरात ‘पार्सल बॉम्ब’, नवऱ्याचा मृत्यू!

Parcel Bomb, Groom Death

ओडिशा: सौम्य आणि रिमा साहू १८ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या पाचव्या दिवशी या दोघांना आहेरात भेटवस्तू आली. ही भेटवस्तू उघडून पाहताना तिचा स्फोट झाला यात सौम्य आणि त्याचा आजीचा मृत्यू झाला तर रिमा गंभीर जखमी झाली. दोन महिन्यांनंतर या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. सूड उगवण्यासाठी महाविद्यालयीन प्राध्यापकानं हत्येचा कट रचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

सौम्यची आई संजुक्ता साहू या ज्योती विकास महाविद्यालयाच्या मुख्यधापिका आहेत. त्यांचा सहकारी पुंजीलाल मेहर यांना डावलून संजुक्ता यांना मुख्याधापिकेचं पद देण्यात आल्याचा राग पुंजीलाल यांचा मनात होता. हिच आकस मनात ठेवून पुंजीलाल यांनी संजुक्ता यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती पोलीस उपायुक्त आरपी शर्मा यांनी दिली. या प्रकरणात पुंजीलाल मेहरला गुन्हे विभागानं बुधवारी उशीरा रात्री अटक केली.

सौम्य आणि रिमा विवाहबंधनात अडकून पाच दिवस झाले होते. यावेळी कुरिअरद्वारे त्यांच्यासाठी भेट आली. आहेर असेल या कल्पनेनं सौम्य आणि रिमानं ही भेटवस्तू उघडून पाहिली आणि काही क्षणात मोठा स्फोट झाला. यात सौम्यच्या आजींचा आणि त्याचा मृत्यू झाला. तर रिमा गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून ओदिशाचे पोलीस या प्रकरणाचा छडा लावत होते. हा स्फोट म्हणजे वैयक्तिक आकसातून साहू कुटुंबियांना संपवण्याचा डाव असल्याचं तपासात समोर आलं आहे.

मुख्यध्यापिका संजुक्ता यांच्या कुटुंबाचा काटा काढण्यासाठी पुंजीलाल गेल्या सात महिन्यांपासून बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस महानिरिक्षक अरुण बोथरा यांनी दिली. पोलिसांनी पुंजीलाल यांच्या घरातून ज्वलनशील पदार्थ, गनपावडर, लॅपटॉप, पेन ड्राईव्ब जप्त केले आहेत. इंटरनेटवर पाहून पुंजीलाल बॉम्ब तयार करण्यास शिकले, तसेच बॉम्बची चाचणी झाल्यानंतर त्यांनी स्वत: पॅक करून तो कुरिअर कंपनीकडे दिला अशीही माहिती पोलिसांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments