Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेश#GoBackModi ट्विटरवर ट्रेंडमध्ये; निषेधाची लाट

#GoBackModi ट्विटरवर ट्रेंडमध्ये; निषेधाची लाट

PM Modi, modi go backमहत्वाचे…
१. सोशल मीडियावर मोदींचा जोरदार निषेध
२. #गोबॅकमोदी हा हॅशटॅग वापरुन अनेकांनी ट्विटरवर त्यांच्या भावना व्यक्त केल्या
३. मोदी सरकारनं तामिळनाडूची भूमिका नीट मांडली नाही


चेन्नई: आजपासून चेन्नईत डिफेन्स एक्स्पोला सुरुवात होणार आहे. संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्यांचा या एक्स्पोमध्ये सहभाग असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या एक्स्पोचं उद्घाटन करणार आहे. मात्र मोदींच्या तामिळनाडू भेटीच्या आधी ट्विटरवर #GoBackModi ट्रेंड होत आहे. सध्याच्या घडीला हा हॅशटॅग भारतात सर्वाधिक ट्रेंडमध्ये आहे. कावेरी पाणी वाटप प्रश्नात अन्याय झाल्याची भावना तामिळनाडूतील लोकांमध्ये आहे. त्यामुळेच #गोबॅकमोदी हा हॅशटॅग वापरुन अनेकांनी ट्विटरवर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 
कावेरी पाणी वाटप प्रश्नात तामिळनाडूला मोठा धक्का बसला. कावेरी पाणी वाटप प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल अन्यायकारक असल्याचं तामिळनाडूतील जनतेला वाटतं. या प्रकरणात मोदी सरकारनं तामिळनाडूची भूमिका नीट मांडली नाही, अशी लोकांची भावना आहे. त्यामुळे राज्यातील जनता मोदी सरकारवर नाराज आहे. या पार्श्वभूमीवर मोदी तामिळनाडूत येत आहेत. मोदींच्या या तामिळनाडू भेटीचा निषेध सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

‘इथं येऊन खोटे अश्रू ढाळू नका. तामिळनाडूतील जनतेला मूर्ख बनवू नका. हे तामिळनाडू आहे, गुजरात नाही, हे लक्षात असू द्या,’ अशा प्रकारच्या भावना अनेकांनी ट्विटमधून व्यक्त केल्या आहेत. तर काहींनी कावेरीचं पाणी पुरेशा प्रमाणात मिळालंच नाही, तर जगायचं कसं, असा सवाल मोदींना विचारला आहे. एका ट्विटर युजरनं तर मोदींना थेट चहा विकण्याचा सल्ला दिला आहे. ‘तुम्ही पुन्हा एकदा चहा विकण्यास सुरुवात करा. त्यामुळे देशाचं भलं होईल,’ असं ट्विट एका व्यक्तीनं केलंय. तर ‘तामिळी जनता मोदींना राजकीय व्हिसा देणार नाही,’ अशीही प्रतिक्रिया ट्विटरवर पाहायला मिळते आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments