Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeदेशएनआरसी, एनपीआर हे देशातील गरिबांवरील टॅक्स; राहुल गांधीचे टीकास्त्र

एनआरसी, एनपीआर हे देशातील गरिबांवरील टॅक्स; राहुल गांधीचे टीकास्त्र

नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) तसेच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) च्या मुद्यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केंद्रसरकारवर टीकास्त्र सोडले आहे. एनआरसी व एनपीआर हे देशातील गरिबांवरील टॅक्स आहे व नोटाबंदी देखील देशातील गरिबांवरील टॅक्सच होता, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

 भावांमध्ये भाडंण लावून देशाचं भलं होऊ शकत नाही. देशाची परिस्थिती सर्वांनाच माहिती आहे. शेतकरी आत्महत्या, अर्थव्यवस्थेची वाईट परिस्थिती, बेरोजगारी या सर्व समस्या आज समोर आहेत. मी स्पष्टपणे सांगतो की, जोपर्यंत देशातील सर्व नागरिकांना एकमेकांशी जोडले जात नाही, या समस्या संपणार नाहीत. तसेच, अगोदर जग म्हणत होतं की, भारत व चीन एकाच गतीने पुढे जात आहे. मात्र आता जग भारतात हिंसा पाहत आहे, महिला रस्त्यांवर स्वतःला सुरक्षित समजत नाहीत, बेरोजगारी वाढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments