Thursday, May 2, 2024
Homeक्रीडाभारताच्या मानसीने वर्ल्ड पॅरा बॅडमिंटनच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं

भारताच्या मानसीने वर्ल्ड पॅरा बॅडमिंटनच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं

सिंधूसोबत मानसी जोशीने पॅरा बॅडमिंटनमध्ये सुवर्णअक्षरात स्वतःसह भारताचं नाव कोरलं

बासेल: एक पाय गमावलेली व्यक्ती म्हटलं तर व्हिलचेअर किंवा वॉकर घेऊन चालणाऱ्या व्यक्तीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर लगेच उभं राहतं. अनेकदा एक पाय नसल्याने या व्यक्ती कसं काम करत असतील हा प्रश्न देखील आपल्यासमोर उभा राहतो. मात्र आपल्याला पडणाऱ्या या सर्व प्रश्नांना उत्तर दिलं आहे ते मानसी जोशी हिने. एक पाय गमावून भारताच्या मानसीने वर्ल्ड पॅरा बॅडमिंटनच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे.

भारताची बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधूला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकावलं आहे. मात्र सिंधूसोबत मानसी जोशीने पॅरा बॅडमिंटनमध्ये सुवर्णअक्षरात स्वतःसह भारताचं नाव कोरलं आहे. अपघातात पाय गमावल्यानं तरही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर बासेलमध्ये झालेल्या वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या महिला एकेरीच्या जेतेपदाला गवसणी घातली आहे.

2011 मध्ये एका अपघातात मानसीने डावा पाय गमावला. त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी मानसीने मैदानावर पुनरागमन केलं. जिद्द, चिकाटी आणि अथक प्रयत्नांच्या जोरावर तिने विजेते पद जिंकलं.

बासेलमध्ये झालेल्या वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या महिला एकेरीच्या एसएल-3 च्या अंतिम फेरीत मानसीने पारुल परमारचा 21-12, 21-7 असा पराभव करून जेतेपद जिंकलं आहे. मुख्य म्हणजे तीन वेळा विश्वविजेती ठरलेल्या परमारचा मानसीने पराभव केला. मानसीच्या या कामगिरीवर संपूर्ण देशातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

मानसी हि पुलेला गोपीचंद यांच्या अकादमीमध्ये प्रशिक्षण घेते. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 14 पदकं जिंकली आहेत. यामध्ये तीन सुवर्ण पदकांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments