Thursday, June 20, 2024
Homeदेशममता बॅनर्जींनी 291 उमेदवारांची यादी केली जाहीर; 52 महिला आणि 42 मुस्लिम...

ममता बॅनर्जींनी 291 उमेदवारांची यादी केली जाहीर; 52 महिला आणि 42 मुस्लिम उमेदवारांना संधी

24 विद्यमान आमदारांचे पत्ते कापले, 100 नवीन चेहऱ्यांना संधी

mamata-banerjee-tmc-party-candidate-list-announcement-news-updates-west-bengal-assembly-election-2021
mamata-banerjee-tmc-party-candidate-list-announcement-news-updates-west-bengal-assembly-election-2021

पश्चिम बंगाल:  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा, राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी  सर्व 291 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. च्या यादीत 100 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यंदा 50 महिला आणि 42 मुस्लिम उमेदवारांना संधी मिळाली आहे. 24 विद्यमान आमदारांचे तिकीट कापले आहे. उमेदवारांची यादी जाहीर केलेला तृणमूल पहिलाच पक्ष आहे.

तृणमूल दार्जिलिंगच्या 3 जागांवर आपले उमेदवार उतरवणार नाही, या जागा सहयोगी पक्षासाठी सोडण्यात आल्या आहेत. दरम्यान, स्वतः ममता बॅनर्जी नंदीग्रामवरुन निवडणूक लढवणार आहेत. नंदीग्राम ममता बॅनर्जींचे जवळचे आणि आता भाजपमध्ये प्रवेश केलेले शुभेंदु अधिकारी यांचा बालेकिल्ला आहे.

नुकतेच पक्षात सामील झालेला माजी क्रिकेटर मनोज तिवारीला पक्षाने हावडाच्या शिवपूरमधून उमेदवारी दिली आहे. याशिवाय, भवानीपूरमधून शोभन देव चटोपाध्याय निवडणुकीच्या मैदानात असतील. ममता सरकारमध्ये अर्थ मंत्री राहिलेले अमित मित्रा निवडणूक लढवणार नाहीत. पक्षाने यंदा 24 विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले आहे.

हेही वाचा: वसई विरार महापालिका निवडणूक: वसईत ‘बविआ’सोबत आघाडीसाठी ‘मविआ’ उत्सुक

बंगालमध्ये 8 टप्प्यात निवडणूक

पश्चिम बंगालमध्ये यंदा 8 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 294 जागेच्या विधानसभेसाठी मतदान 27 मार्च (30 सीट), 1 एप्रिल (30 सीट), 6 एप्रिल (31 सीट), 10 एप्रिल (44 सीट), 17 एप्रिल (45 सीट), 22 एप्रिल (43 सीट), 26 एप्रिल (36 सीट), 29 एप्रिल (35 सीट) होणार आहे. तसेच, या निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी जाहीर होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments