Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेशकेदारनाथाचे दरवाजे भाविकांसाठी खुले

केदारनाथाचे दरवाजे भाविकांसाठी खुले

Kedarnath Mandirरूद्रप्रयाग (उत्तराखंड)​ – बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज उघडण्यात आले. आज रविवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास विधीवत पूजा, मंत्रोच्चार करुन भाविकांसाठी केदारनाथचे दरवाजे उघडण्यात आले. उत्तराखंडचे राज्यपाल के. के. पॉल, विधानसभा अध्यक्ष प्रेमचंद अग्रवाल आणि हजारो भाविक यावेळी उपस्थित होते. केदारनाथ मंदिराचे प्रवेशद्वार विशेष पद्धतीने सजवण्यात आले आहे.

८ व्या शतकात आदिशंकराचार्यांनी या मंदिराचे नवनिर्माण करून जिर्णोद्धार केला होता. केदारनाथ हिंदूचे पवित्र स्थळं असलेल्या चार धामांपैकी एक मानले जाते. बारा ज्योतिर्लिंगापैकी हे सर्वात उंच ज्योतिर्लिंग आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments