Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशकाँग्रेस २०१९ मध्ये पुन्हा आपली ताकद दाखवेल- राहुल गांधी

काँग्रेस २०१९ मध्ये पुन्हा आपली ताकद दाखवेल- राहुल गांधी

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी पक्षाच्या महाविधेशनाच्या व्यासपीठावरून भाजपाविरोधी धर्मयुद्धाचे रणशिंग फुंकले. काँग्रेस २०१९ मध्ये पुन्हा आपली ताकद दाखवेल असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोष भरला.

यावेळी त्यांनी भाजपाची तुलना कौरवांशी करताना सांगितले की, अनेक शतकांपूर्वी कुरुक्षेत्रावर पांडव आणि कौरवांमध्ये मोठे युद्ध झाले होते. कौरव हे सामर्थ्यशाली व उन्मत्त होते. तर पांडव हे नम्र आणि सत्यासाठी लढणारे होते. भाजपा आणि संघ हे कौरवांप्रमाणेच फक्त सत्तेसाठी लढत आहेत. याउलट काँग्रेस पक्ष हा सत्यासाठी लढत आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष दिसून येत आहेत.

राहुल गांधी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे ….

  • देशातील प्रत्येक धर्मातील तरुण आणि तरुणांच्या शक्तीशिवाय देश बदलणे शक्य नाही
  • काँग्रेसनं कधीही द्वेषाचं राजकारण केलं नाही
  • नेता आणि कार्यकर्तामधील भिंत आम्ही तोडणार
  • देशातील तरुणांना रोजगार फक्त काँग्रेसच देऊ शकतो
  • मोदी आडनाव भ्रष्टाचाराचं दुसरं नाव झालंय
  • भाजप सत्तेसाठी काहीही करु शकतं, काँग्रेसचा जनतेसाठी काहीही करु शकतं
  • तुम्ही देशातील तरुणांना विचारा, तुम्ही काय करता त्याचे उत्तर मिळेल
  • गेल्या दहा वर्षात राजकारणात खूप काही शिकायला मिळाले
  • गुजरात निवडणुकीत मी मंदिरामध्ये गेल्यामुळं माझ्याबद्दल चूकीचे वक्तव्य केलं, मी मंदिरासोबत गुरुद्वार, चर्चमध्येही जातो. आणि गुजरात निवडणुकीआधीही मी मंदिर आणि मस्जिदमध्ये गेलो आहे. तर आताच का प्रश्न उपस्थित केला
  • काँग्रेस देशाचा आवाज, तर भाजप संघाचा आवाज
  • एका हत्येच्या आरोपीला पक्षाचे अध्यक्ष बनवलं
  • आम्हाला खरे बोलण्यापासून कोणीही आडवू शकत नाही
  • भाजपाला सत्तेची नशा चढलेय, राहुल गांधींकडून कौरवांशी तुलना

इतर वृत्त लवकरच….

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments