Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशकर्नाटकात काँग्रेसला,राष्ट्रवादीनंतर या पक्षांचाही पाठिंबा!

कर्नाटकात काँग्रेसला,राष्ट्रवादीनंतर या पक्षांचाही पाठिंबा!

बंगळुरू: कर्नाटक विधानसभेची निवडणूक पुढील महिन्यात होत आहे. तेथे काँग्रेस, भाजप आणि जेडी (एस) यांच्यात तिरंगी लढत आहे. मात्र, सत्ताधारी काँग्रेसच्या जमेच्या बाजू वाढत चालली आहे. इंडिया टुडेने केलेल्या सर्व्हेत कर्नाटकात काँग्रेस आघाडीवर राहील असे म्हटले आहे. सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसला कर्नाटकात बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता, तर आता खासदार ओवीसींच्या एमआयएमने कर्नाटकमध्ये एकही उमेदवार उभा न करता काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.

कर्नाटकमध्ये एमआयएमने उमेदवार उभे केल्यास काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, एमआयएम पक्षाच्या पदाधिका-यांसोबत खासदार ओवीसींनी चर्चा केल्यानंतर सांप्रदायिक व जातीयवादी शक्ती रोखण्यासाठी कर्नाटक विधानसभेत उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेत काँग्रेसचा मार्ग मोकळा केला आहे. याआधी राष्ट्रवादीने काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

काँग्रेस सर्व्हेतही सर्वात मोठा पक्ष

इंडिया टुडेने घेतलेल्या सर्व्हेनुसार, २२४ जागा असणा-या कर्नाटक विधानसभेच्या सभागृहात काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत पक्षाला ९२ ते १०१ जागा मिळतील असा अंदाज बांधला आहे. तर, भारतीय जनता पक्षाला ७८ ते ८६ जागा मिळू शकतात. माजी पंतप्रधान एचडी दैवेगौडा यांच्या जनता दल (सेक्युलर) पक्षाला ३४ ते ४३ जागा मिळतील असे इंडिया टुडेच्या सर्व्हेत म्हटले आहे.

२०१३ साली काँग्रेसने २२४ पैकी १२२ जागा जिंकल्या होत्या. तर भाजप व जेडी (एस)ला प्रत्येकी ४० जागा मिळाल्या होत्या. येडीयुरप्पा यांच्या कर्नाटक जनता पार्टीला ७ जागा मिळाल्या होत्या.

सिद्धरामय्यांना बहुमत मिळण्याचा विश्वास

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी इंडिया टुडेच्या सर्व्हेनंतर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, कर्नाटकात यंदा पुन्हा एकदा काँग्रेस बहुमताने सत्तेत येणार आहे. ओपिनियन पोल काय म्हणताहेत हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचे नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments