Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशन्यायाधीशांनी ओमर अब्दुल्ला प्रकरणातून अंग घेतलं काढून

न्यायाधीशांनी ओमर अब्दुल्ला प्रकरणातून अंग घेतलं काढून

Omar Abdullahनवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या स्थानबद्धतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज बुधवार ( १२ फ्रेब्रुवारी) रोजी सुनावणी होती ती टळलीय. आता या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) सुनावणी होणार आहे.

ओमर यांच्या स्थानबद्धतेला त्यांची बहिण सारा पायलट यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केलीय. आज बुधवारी या प्रकरणाची सुनावणी होणार होती. परंतु, या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायाधीश शांतनागौदर यांनी स्वत:ला या प्रकरणापासून वेगळं केलं. त्यामुळे आता दुसरंच खंडपीठ या प्रकरणात शुक्रवारी सुनावणी करणार आहे.

ओमर यांच्या स्थानबद्धतेस दिले आव्हान…

अनुच्छेद ३७० हटवला गेल्यानंतर ५ ऑगस्ट २०१९ पासून ओमर अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. ५ फेब्रुवारी रोजी ओमर यांची बहिण आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या पत्नी सारा पायलट यांनी अब्दुल्ला पीएसए अंतर्गत ताब्यात घेणं असंविधानिक आहे तसंच हे मूलभूत हक्कांचं उल्लंघन असल्याचं म्हणत याविरोधात याचिका दाखल केली. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्यामार्फेत सारा यांनी हेबियस कॉर्पस अंतर्गत ही याचिका दाखल केली होती.

न्यायमूर्ती एन व्ही रमण, न्यायमूर्ती मोहन शांतानागौदर आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली होती. परंतु, सुनावणीच्या सुरुवातीलाच आपण या सुनावणीत सहभागी होणार नाही, असं शांतनागौदर यांनी स्पष्ट केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments