Friday, May 3, 2024
Homeदेश९ वर्षीय चिमुरड्याने लावला शब्दसंख्या मोजणाऱ्या पेनाचा शोध

९ वर्षीय चिमुरड्याने लावला शब्दसंख्या मोजणाऱ्या पेनाचा शोध

child boy, envent pen count wordsश्रीनगर : वयाचा नववा वर्ष हा तर खेळण्याचा बागळण्याचा परंतु येथे या चिमुरड्याने वेगळ काही करुन दाखवल. बांदीपोरामधील गुरेझचा रहिवासी असलेल्या ९ वर्षीय मुझफ्फर अहमद खानने काउंटिंग पेनचा शोध लावला.या पेनच्या मदतीने लिहिताना शब्दांची संख्या मोजता येत आहे. यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठानद्वारे आयोजित करण्यात आलेल्या नवकल्पना आणि उद्योजकांच्या महोत्सवामध्ये या पेनाचा नमुना प्रदर्शित करण्यात आला.

एकदा लिहायला सुरुवात केली, की पेन त्याच्याशी संलग्न असलेल्या लहान एलसीडी मॉनिटरवर शब्दगणना दर्शवतो. मोबाईलवर संदेशाद्वारेदेखील शब्दगणना प्रदर्शित केले जाऊ शकते, अशी माहिती मुजफ्फर अहमद खान याने दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments