Friday, June 21, 2024
Homeदेशचहा पावडरऐवजी चुकून कीटकनाशक टाकले, ४ जणांचा मृत्यू

चहा पावडरऐवजी चुकून कीटकनाशक टाकले, ४ जणांचा मृत्यू

बिहार: बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात विषारी चहा प्यायल्यामुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. एक महिला गंभीर असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पतोर पोलीस ठाण्यातंर्गत येत असलेल्या उघरा गावातील रहिवासी रामस्वरूप महतों यांच्या घरी एका मुलाने चहा बनवला. चहा तयार करताना त्याने चुकून चहा पावडर ऐवजी कीटकनाशक टाकले. हा चहा प्यायल्यानंतर घरातील सर्व लोकांची तब्येत बिघडली. त्यानंतर लगेचच तीन जणांचा घरातच मृत्यू झाला.

ग्रामस्थांच्या मदतीने पीडित दोन लोकांना त्वरीत रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये रामस्वरूप महतो (वय ६५), प्रकाश महतो (१२), अर्चना कुमारी (६), दुखा महतो (४५) यांचा समावेश असल्याचे पतोर सहायक ठाण्याचे प्रभारी बुद्धदेव राम यांनी सांगितले.

पीडित महिलेवर दरभंगा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू करण्यात आला आहे. एकाच कुटुंबातील चौघा जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments