Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशभारतीय अभियंत्याच्या हत्येतील अमेरिकी नागरिकाला ५० वर्षांचा तुरुंगवास!

भारतीय अभियंत्याच्या हत्येतील अमेरिकी नागरिकाला ५० वर्षांचा तुरुंगवास!

महत्वाचे….
१. कन्सास शहरात श्रीनिवास कुचीभोतला या भारतीय अभियंत्याची हत्या करण्यात आली होती
२. आरोपी अ‍ॅडम पुरिन्टनने (५१) न्यायालयात गुन्हा मान्य केला
३. फेब्रुवारी २०१७ मध्ये अमेरिकेतील कन्सास शहरात झाली होती हत्या


कन्सास, अमेरिका: मूळचा हैदराबाद येथील रहिवासी अभियंता श्रीनिवास कुचीभोतला (३२) याच्या हत्याप्रकरणातील आरोपी अ‍ॅडम पुरिन्टनने (५१) न्यायालयात गुन्हा मान्य केला आहे. अॅडमने गुन्हा मान्य केल्यानंतर न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आहे. आता अॅडमला जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता असून  या ५० वर्षांमध्ये अॅडमला पॅरोल देखील मिळणार नाही.

फेब्रुवारी २०१७ मध्ये अमेरिकेतील कन्सास शहरात श्रीनिवास कुचीभोतला (३२) या भारतीय अभियंत्याची हत्या करण्यात आली होती. श्रीनिवास हा मूळचा हैदराबाद येथील रहिवासी होता. श्रीनिवास गार्मिन या कंपनीच्या मुख्यालयात जीपीएस निर्माता म्हणून काम करायचा. घटना घडली त्या दिवशी श्रीनिवास, त्याचा सहकारी आलोक मदासानी याच्याबरोबर ओलेद येथील ऑस्टिन्स बार अ‍ॅण्ड ग्रील या बारमध्ये फुटबॉलचा सामना बघत बसला होता. त्याच बारमध्ये अ‍ॅडम पुरिन्टन (५१) हा अमेरिकी नौदलातून निवृत्त झालेला सैनिकही बसला होता. अ‍ॅडमने श्रीनिवास आणि आलोक यांच्याशी वाद उकरून काढला. वादादरम्यान त्याने श्रीनिवास आणि आलोक यांना उद्देशून ‘तुम्ही दहशतवादी आहात. माझ्या देशातून चालते व्हा’, असे ओरडून सांगितले. तसेच ‘तुम्ही आमच्या देशात काय करत आहात’, अशी विचारणा करत दोघांवर चाल केली. मात्र बारमधील इतरांनी अ‍ॅडमला अडवले. त्यानंतर अ‍ॅडम तेथून बाहेर पडला व थोड्या वेळाने बंदूक घेऊन पुन्हा बारमध्ये आला. अॅडमच्या गोळीबारात श्रीनिवासचा मृत्यू झाला. तर आलोक जखमी झाला होता. वर्णद्वेषातून घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी अॅडमला अटक केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments