Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेशम्हणून पाकिस्तान 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करतो...

म्हणून पाकिस्तान 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करतो…

मुंबई : प्रत्येक भारतीय १५ ऑगस्ट २०१९ रोजी देशाचा ७३ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. १५ ऑगस्ट रोजीच इंग्रजांच्या २०० वर्षांच्या गुलामीगिरीतून भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. पण या स्वातंत्र्यासोबत आपल्या वाट्याला एक दुःखही आले होते. आपला देश दोन देशात विभाजित झाला होता. भारतापासून वेगळा होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली होती. १५ ऑगस्ट १९४७ ही तीच तारीख आहे ज्या दिवशी ब्रिटिश सत्तेपासून भारत स्वतंत्र झाला होता. पाकिस्तानला पण याच दिवशी स्वातंत्र्य मिळाले होते. पण पाकिस्तान आपल्या स्वातंत्र्यदिन हा भारताच्या एक दिवस अगोदर म्हणजे १४ ऑगस्ट रोजी साजरा करतो.

भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार भारत आणि पाकिस्तान एकाच दिवशी स्वतंत्र झाले होते. पण पाकिस्तान आपला स्वातंत्र्यदिन १४ ऑगस्ट रोजी साजरा करण्यामागे अनेक कारणं आहेत. एक वेगळे राष्ट्र म्हणून पाकिस्तानला १४ ऑगस्ट रोजी स्वीकृती मिळाली होती. लॉर्ड माऊंटबॅटन यांना भारत आणि पाकिस्तान या दोघांच्या स्वातंत्र्यदिनी उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी १४ ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन घोषित केला. या दिवशी लॉर्ड माऊंटबॅटन यांनी पाकिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून सत्ता सोपवली. लॉर्ड माऊंटबॅटन यांनी १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून निवडला कारण या दिवशी मित्र देशांच्या सेनेसमोर जपानने आत्मसमर्पण केले होते. त्याचा दुसरा वर्धापन दिन होता.

मीडिया रिपोर्टनुसार १४ ऑगस्ट रोजी रमजानचा २७ दिवस होता. जो इस्लामीक कॅलेंडरनुसार पवित्र मानला जातो. यामुळे पाकिस्तानने आपला स्वातंत्र्यदिन याच दिवशी म्हणजे १४ ऑगस्ट रोजी करण्याचे ठरविले. हे पण म्हटले जाते की १९४८ मध्ये पाकिस्तानने पहिले  डाक तिकीट जारी केले होते. त्यात स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट १९४७ याची नोंद आहे. नंतर १९४८ मध्ये पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य दिन १४ ऑगस्ट करण्यात आला. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांनी १५ ऑगस्ट रोजीही पाकिस्तान बनण्याची घोषणा केली होती.

पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट ऐवजी १४ ऑगस्टला मानण्याचे एक कारण हे देखील आहे. की भारतीय स्वातंत्र्यता विधेयक ४ जुलै रोजी ब्रिटीश संसदेत सादर करण्यात आले होते. १५ जुलै रोजी याचे कायद्यात रुपांतर झाले. या विधेयकात म्हटले होते की, १४-१५ ऑगस्टच्या मध्यरात्र भारताचे विभाजन होईल. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान असे दोन नवीन राष्ट्र निर्माण होतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments