Placeholder canvas
Tuesday, April 30, 2024
Homeदेशउत्तर प्रदेशात दोन मतदारसंघात आज तिरंगी लढत!

उत्तर प्रदेशात दोन मतदारसंघात आज तिरंगी लढत!

Yogi Adityanath,Mayawati,Akhilesh Yadavमहत्वाचे…
१. काँग्रेस स्वबळावर निवडणुकीत उतरल्याने ही लढत तिरंगी होणार आहे
२. उत्तर प्रदेशातील फूलपूर व गोरखपूर या लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुक
३. मतमोजणी १४ मार्च रोजी होणार


लखनौ: उत्तर प्रदेशातील फूलपूर व गोरखपूर या लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज, रविवारी मतदानाला सुरुवात झाली. भाजपला टक्कर देण्यासाठी मायावतींच्या नेतृत्वातील बसपाने सपाला पाठिंबा दिला. काँग्रेस स्वबळावर निवडणुकीत उतरल्याने ही लढत तिरंगी होणार आहे. या निवडणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, निमलष्करी दलाचे साडेसहा हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. गोरखपूरमध्ये १०, तर फुलपूरमध्ये २२ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीची मतमोजणी १४ रोजी होणार आहे.

या मतदानासाठी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलांचे सुमारे साडेसहा हजार जवान तैनात करण्यात आले असून, याशिवाय प्रांतिक सशस्त्र दल (पीएसी) आणि गृहरक्षक दल यांचे कर्मचारीही मतदान शांततेत होईल हे सुनिश्चित करण्यासाठी दक्ष असणार आहेत. मुख्यमंत्री आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे दोघे विधान परिषदेवर निवडून आल्यामुळे रिकाम्या झालेल्या अनुक्रमे गोरखपूर व फुलपूर मतदारसंघांत हे मतदान होत आहे.

यापूर्वी लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणुकांत भाजपने इतरांची धूळधाण उडवली होती. त्यामुळे सप-बसप प्रयोग यशस्वी झाल्यास उत्तर प्रदेशातील या दोन मोठय़ा पक्षांना २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकांत भाजपला टक्कर देण्यासाठी एकत्र येण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने या पोटनिवडणुकीचे निकाल महत्त्वाचे ठरणार आहेत.

गोरखपूर मतदारसंघात १०, तर फूलपूर मतदारसंघात २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गोरखपूरमधून पाचवेळा निवडून आलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हा मतदारसंघ बालेकिल्ला असल्याने भाजपसाठी तो महत्त्वाचा आहे. तर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या फुलपूरमधून २०१४च्या निवडणुकीत केशवप्रसाद मौर्य यांनी विजय मिळवला होता.

का होत आहे निवडणूक…
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने गोरखपूर येथील जागा रिकामी झाली आहे. तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने फुलपूरची जागा रिकामी झाली आहे. गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाने उपेंद्र दत्त शुक्ला आणि फुलपूर मधून कौशलेंद्र पटेल यांना उमेदवारी दिली आहे. गोरखपूर आणि फुलपूरमध्ये बहुजन समाज पक्षाने समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असून, काँग्रेस स्वबळावर लढत आहे.

आदित्यनाथांनी केलं मतदान…

विकास आणि गुड गव्हर्नन्ससाठी भाजपाची गरज आहे, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथे मतदान केल्यानंतर म्हटले. त्यापूर्वी सकाळी ५ वाजता ते गोरखनाथ मंदिरात पोहोचले होते. गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही ठिकाणच्या जागा भाजपासाठी महत्त्वाच्या आहेत. मात्र त्यातही गोरखपूरची निवडणूक भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments