Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशलोकसभेत विरोधकांनी मोदींच्या भाषणात “जुमलेबाजी बंद” करोच्या दिल्या घोषणा!

लोकसभेत विरोधकांनी मोदींच्या भाषणात “जुमलेबाजी बंद” करोच्या दिल्या घोषणा!

नवी दिल्ली: लोकसभेत विरोधकांच्या गदारोळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरु आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत उत्तर देत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसला खडे बोल सुनावत आहेत. विरोधक टीका करताना तीच कॅसेट पुन्हा पुन्हा चालवतात असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला. विरोधकांनी जुमलेबाजी बंद करा च्या दिल्या घोषणा. विरोधकांच्या घोषणेबाजीत मोदींना भाषण दिले.

‘तुम्ही भारताचे तुकडे केलेत, तरीही देशातील जनता तुमच्यासोबत राहली. देशावर तुम्ही राज्य करत होतात. विरोधी पक्ष जणू अस्तित्वातच नव्हता. काँग्रेसनं इतकी वर्ष एकाच कुटुंबाचं गुणगान गायलं. देशाने एकाच कुटुंबाला ओळखावं यासाठी सगळी शक्ती पणाला लावली. तुमची वृत्ती चांगली असती तर हा देश कितीतरी पुढे गेला असता’, असं नरेंद्र मोदी बोलले आहेत.

दरम्यान विरोधकांचा गरादोळ सुरुच असून झुटा भाषण बंद करो, झुटे आश्वासन बंद करो, अशी घोषणाबाजी विरोधक करत आहेत. क्या हुआा, क्या हुआ, १५ लाख का क्या हुआ? अशाही घोषणा यावेळी दिल्या जात आहेत.

‘देशाला लोकशाही काँग्रेसनं किंवा नेहरुंनी दिलेली नाही. लोकशाही ही आमच्या रक्तात आहे, आणची परंपरा आहे. तुम्ही लोकशाहीच्या गप्पा मारता? तुमचे पंतप्रधान राजीव गांधींनी हैदराबाद विमानतळावर आपल्याच पक्षाच्या दलित मुख्यमंत्र्यांना सर्वांसमोर अपमानित केलं होतं’, ही आठवण नरेंद्र मोदींनी काँग्रेसला करुन दिली. आम्हाला तुम्ही लोकशाही शिकवू नका. तुम्हाला ते शोभून दिसत नाही. सरदार वल्लभभाई पटेल जर देशाचे पहिले पंतप्रधान असते, त संपूर्ण काश्मीर आपलं असतं. आपल्यानंतर स्वातंत्र्य झालेल्या अनेक देशांनी प्रगती केली आहे हे मान्य करा’, असं नरेंद्र मोदी बोललेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments