Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeदेशराजस्थानमध्ये पोटनिवडणूकीत काँग्रेसची विजयाकडे वाटचाल

राजस्थानमध्ये पोटनिवडणूकीत काँग्रेसची विजयाकडे वाटचाल

जयपूर: राजस्थानमधील लोकसभा व विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. यामध्ये अजमेर, अलवर या लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर तिकडे मांडलगढमध्येही भाजपचा उमेदवारास मागे टाकत विवेक धाकड यांनी आघाडी घेतली आहे.

अलवर लोकसभा मतदार संघातून करण सिंह यादव हे मुसंडी मारत आघाडीवर आहेत. तर अजमेर लोकसभेच्या जागेवर काँग्रेसचेच रघु शर्मा यांची घौडदौड सुरू आहे. मांडलगढ विधानसभेच्या हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेसचे उमेदवार विवके धाकड हे आघाडीवर आहेत.
मांडलगढच्या जागेची निवडणूक ही प्रतिष्ठेची झाली आहे. येथे काँग्रेसचे माजी मंत्री आणि सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या जागेचे निकाल हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तिकीटासाठी महत्वाच्या मानले जात आहेत. या ठिकाणी भाजपचे उमेदवार शक्ती सिंह हाडा यांना विजयी करण्यासाठी सरकारने संपूर्ण  ताकद पणाला लावली आहे. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या सह त्याचे सपूर्ण कॅबिनेटन येथे ठाण मांडून बसले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments