skip to content
Sunday, May 19, 2024
Homeदेशराजकारणातून 'मी रिटायर होत आहे', सोनिया गांधींचे स्पष्टीकरण

राजकारणातून ‘मी रिटायर होत आहे’, सोनिया गांधींचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली – काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधींनी पक्षाध्यक्ष पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर सोनिया गांधी या राजकारणातून निवृत्ती घेणार आहेत. आज सोनिया गांधी यांनी माध्यम प्रतिनिधींना याबाबतची माहिती दिली.

राहुल गांधी शनिवारी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. राहुल अध्यक्ष झाल्यानंतर पक्षात तुमची भूमिका काय असणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ‘मी रिटायर होत आहे’, असे उत्तर सोनिया गांधींनी पत्रकारांना दिले. सोनिया गांधी १९९८ मध्ये काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या. त्यांनी गेली १९ वर्षे काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. सोनिया गांधी यांना माजी मनमोहन सिंह यांनी “सुपर पंतप्रधान” अशी उपमा दिली होती. १९९१ मध्ये पती राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधीनी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळायला नकार दिला होता. त्यानंतर पी.व्ही.नरसिंह राव यांच्या निवडीचा विचार करण्यात आला त्यानंतर ते पंतप्रधान झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments