Placeholder canvas
Monday, May 6, 2024
HomeदेशCinema theaters : सिनेप्रेमींसाठी आनंदाची बातमी, चित्रपटगृह १०० टक्के क्षमतेने सुरू होणार

Cinema theaters : सिनेप्रेमींसाठी आनंदाची बातमी, चित्रपटगृह १०० टक्के क्षमतेने सुरू होणार

नवी दिल्ली : प्रेक्षकांना सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. केंद्र सरकारने चित्रपटगृह, मल्टीप्लेक्ससाठी नवीन गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. यानुसार आता, १ फेब्रुवारी २०२१ पासून चित्रपटगृह संपूर्ण क्षमतेने म्हणजेच १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने जरी संपूर्ण क्षमतेने चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी दिली असतील तरी प्रेक्षकांना आणि मल्टिप्लेक्स मालकांना कोविड संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.

२०२०मध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि त्यासोबतच चित्रपटगृह, थिएटर्स बंद करण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने अनलॉक अंतर्गत सरकारने १५ ऑक्टोबर २०२० पासून सशर्त चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, एकूण क्षमतेच्या केवळ ५० टक्के क्षमतेनेच चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. आता सरकारने १०० टक्के क्षमतेने चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

केंद्र सरकारने १५ ऑक्टोबर २०२० पासून सशर्त चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी दिली होती मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ठाकरे सरकारने चित्रपटगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्य सरकारने ५ नोव्हेंबरपासून राज्यातील कंटेन्मेंट झोनच्या बाहेरील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स सुरू करण्याची परवानगी दिली.

आता केंद्र सरकारने संपूर्ण १०० टक्के क्षमतेने चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी दिली असली आहे मात्र, आता राज्यातील चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास ठाकरे सरकार परवानगी देणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments