Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeदेशचारा घोटाळा:चौथ्या खटल्यातही लालूप्रसाद दोषी

चारा घोटाळा:चौथ्या खटल्यातही लालूप्रसाद दोषी

दिल्ली: चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणातही राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना न्यायालयाकडून कोणता दिलासा मिळालेला नाही. सोमवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दुमका कोषागार प्रकरणी लालूंना दोषी ठरवलं आहे. सहापैकी चार खटल्यात लालूंवरील दोष सिद्ध झाले आहेत.

दुसरीकडे बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची मात्र सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी लालू प्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा यांच्यासहित ३१ जणांना आरोपी करण्यात आलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments