Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeदेशभारतात आर्थिक त्सुनामी येणार : राहुल गांधी

भारतात आर्थिक त्सुनामी येणार : राहुल गांधी

नवी दिल्ली : करोना व्हायरससह देशाच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवर राहुल गांधींनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अंदमान-निकोबारमध्ये त्सुनामी पूर्वी समुद्राचं खाली गेलं होतं तसंच आता सर्वकाही आता तळाला गेलं आहे. यामुळे लवकरच त्सुनामी येणार आहे. असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.

फक्त करोना व्हायरसच नाही तर आर्थिक स्थितीही आणखी वाईट होणार आहे. पुढच्या सहा महिन्यात कल्पना करता येणार नाही, अशा परिस्थितीचा सामना जनतेला करावा लागणार आहे. मोठी आर्थिक त्सुनामी येणार आहे, हे मी आधीच सांगतोय, असं राहुल गांधी म्हणाले.

करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने राहुल गांधींनी केंद्र सरकारला घेरलंय. करोना व्हायरसवर सरकारला आधीच इशारा दिला होता. तयारी सुरू करा, असं सरकारला मी सांगत आलोय. पण सरकार उलट सुलट चर्चा करत आहे. यामुळे मी दुखी आहे. पण आगामी काळात इतका मोठा हादरा बसणार आहे ज्यामुळे कोट्यवधी नागरिक संकटात सापडणार आहेत. अर्थव्यवस्थेला मिळालेल्या रेटींगला काही अर्थ नाही. पंतप्रधान मोदींनी आता तरी जागं व्हावं आणि कामाला लागावं, असं राहुल गांधी म्हणाले. याला भाजप काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments