नोयडा – एक अतीवेगवान कारने एका जोडप्याला धडक दिली. त्यामध्ये २६ वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. वाहनतळातून गाडी बाहेर घेणाऱ्या अल्पवयीन मुलाने ही धडक दिल्याची माहिती समजते. यामध्ये गर्भवती महिलेचा पती जखमी झाला आहे. रविवारी रात्री ही घटना घडली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी झालेल्या त्या गर्भवती महिलेस जवळच्याच रुग्ण्लायात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तसेच डॉक्टर तिच्या ८ महिन्याच्या बाळालाही वाचवू शकले नाहीत. पोलिसांनी याप्रकरणी त्या कारचालकास ताब्यात घेतले आहे.