Placeholder canvas
Tuesday, April 30, 2024
Homeदेशअसीमानंदांना निर्दोष सोडणाऱ्या न्यायाधीशांचा तडकाफडकी राजीनामा

असीमानंदांना निर्दोष सोडणाऱ्या न्यायाधीशांचा तडकाफडकी राजीनामा

Justic ravindra reddyमहत्वाचे…
१.सोमवारी सकाळी मक्का मस्जिद स्फोटात निर्णय सुनावणाऱ्या विशेष एनआयए न्यायाधीश रविंद्र रेड्डी यांनी सायंकाळी तडकाफडकी राजीनामा दिला
२. हैदराबादमधील प्रसिद्ध मक्का मशीदमध्ये २००७ साली झालेल्या स्फोटातील प्रकरणात मुख्य आरोपी स्वामी असीमानंद
३. आरोपींचा निकाल दबाखाली देण्यात आला का? असा तर्कवितर्क लावला जात आहे


हैदराबाद : सोमवारी सकाळी मक्का मस्जिद स्फोटात निर्णय सुनावणाऱ्या विशेष एनआयए न्यायाधीश रविंद्र रेड्डी यांनी सायंकाळी तडकाफडकी राजीनामा दिलाय. न्यूज एजन्सी एएनआयनं ही माहिती दिली. राजीनामा का दिला असे तर्कवितर्क लावले जात आहेत.

हैदराबादमधील प्रसिद्ध मक्का मशीदमध्ये २००७ साली झालेल्या स्फोटातील प्रकरणात मुख्य आरोपी स्वामी असीमानंद यांची हैदराबादच्या नामपल्ली कोर्टाने निर्दोष सुटका केली आहे. त्यांच्या सोबतच देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा, भरत मोहनलाल रतेश्वर उर्फ भरत भाई आणि राजेंद्र चौधरी या

२००७ मधील या स्फोटात ९ लोकांचा मृत्यू झाला होता. तर ५८ जण या स्फोटात जखमी झाले होते. चौकशी दरम्यान एनआयएने असीमानंद आणि लक्ष्मण दास महाराज यांच्यासह अनेक नेत्यांना १९ नोव्हेंबर २०१० ला अटक करत त्यांना या प्रकरणात मुख्य आरोपी केलं होतं.

१८ मे २००७ साली नमाज सुरु असतांना दुपारी १.२५ वाजता पाईप बॉम्बस्फोट झाला होता. हा स्फोट मोबाईलच्या मदतीने घडवून आणला होता. यामध्ये ८ लोकांचा मृत्यू झाला होता. तपासात समोर आलं होतं की, बॉम्ब हा संगमरवर बेंचच्या खाली लावण्यात आला होता. नमाज सुरु असताना त्याला अॅक्टिव्ह करण्यात आलं. या स्फोटादरम्यान हजारो लोक मशीदमध्ये उपस्थित होते. मशीदमध्ये आणखी तीन बॉम्ब सापडले होते. या घटनेनंतर हैदराबादमध्ये लोकांनी प्रदर्शनं केली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी फायरिंग करावी लागली होती. ज्य़ामध्ये देखील लोकांचा मृत्यू झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments