नवी दिल्ली – कार चोरीप्रकरणी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना फटकारलं आहे. कार पार्किंगपासून १०० मीटर दूर का उभी केली होती ? तसंच त्यामध्ये कोणतं सेक्यूरिटी डिव्हाईस का नव्हतं ? असे प्रश्न नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कार चोरी झाल्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी अनिल बैजल यांना पत्र लिहिलं होतं. या पत्राला उत्तर देताना अनिल बैजल यांनी हे प्रश्न विचारत फटकारलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी पत्रातून कायदा – सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हा उपस्थित केलं होतं.