Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशदिल्ली विधानसभा : भाजप- ‘आप’ला टक्कर देण्यासाठी काँग्रेस- राजदचा घरोबा

दिल्ली विधानसभा : भाजप- ‘आप’ला टक्कर देण्यासाठी काँग्रेस- राजदचा घरोबा

Lalu Prasad Yadav , Rahul Gandhiनवी दिल्ली : भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. हाच कित्ता गिरवत झारखंडमध्येही काँग्रेसला यश मिळवलं. आता दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टी आणि भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत आघाडी करणार आहे.

दिल्ली विधानसभेसाठी ८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. सत्ताधारी आम आदमी पार्टीने ७० जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तर काँग्रेस ७० पैकी ६६ जागांवर उमेदवार देणार आहेत. तर चार जागा राष्ट्रीय जनता दलाला देणार आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय जनता दलाने १० जागांची मागणी केली आहे. परंतु त्यावर अद्यापही निर्णय झाला नाही. शनिवारपर्यंत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने आतापर्यंत ४२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. रात्री उशीरा पर्यंत काही उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये मागच्यावेळी ६६ जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी काँग्रेस आणि भाजपचा दारूण पराभव झाला होता. त्यामुळे दोन्ही पक्ष यंदा आप ला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. त्यामुळे दिल्लीमध्ये एवढ्या थंडीमध्येही राजकीय धुराड्यामुळे वातावरण गरम झालेलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments