Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशस्वाती मालिवाल यांनी दहा दिवसांनंतर सोडले उपोषण

स्वाती मालिवाल यांनी दहा दिवसांनंतर सोडले उपोषण

Swati Maliwalनवी दिल्ली : अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना सहा महिन्यांच्या आत फाशी देण्यात यावी, अशी मागणी करत गेल्या दहा दिवसांपासून उपोषण करत असलेल्या स्वाती मालिवाल यांनी रविवारी दुपारी उपोषण सोडले. स्वाती यांनी छोट्या मुलींच्या हातातून फळांचा रस पिऊन उपोषणाची सांगता केली. सुरुवातीला मी एकटीच लढा देत होते. मात्र नंतर संपूर्ण देशातून मला पाठिंबा मिळाला. मला वाटते हा एक ऐतिहासिक विजय आहे, असे स्वाती मालिवाल उपोषण सोडताना म्हणाल्या. 

स्वाती यांच्या उपोषणाच्या शेवटच्या दिवशी सकाळी होमहवन करण्यात आले. जैन धर्माची प्रार्थना गायली गेली. तसेच नमाजही पढण्यात आली. त्यांच्या उपोषणाच्या अखेरच्या दिवशी स्वाती यांची 90 वर्षीय आजीसुद्धा उपस्थित होती. केंद्र सरकारने शनिवारी 12 वर्षांखालील मुलीशी बलात्कार केल्यास आरोपीला फाशी देण्याच्या शिक्षेची तरतूद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यासाठी पॉस्को कायद्यात बदल करण्यासाठी अध्यादेश काढला होता.  त्यानंतर स्वाती यांनी आपल्या उपोषणाची सांगता करण्याची घोषणा केली होती.


 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments