Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeदेशगुजरातमध्ये काँग्रेसच जिंकणार -राहुल गांधी

गुजरातमध्ये काँग्रेसच जिंकणार -राहुल गांधी

अहमदाबाद: गुजरातमध्ये आम्हीच जिंकणार असा आशावाद आज राहुल गांधींनी गुजरातमध्ये व्यक्त केला आहे ते अहमदाबादमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे बोलतांना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आता भ्रष्टाचारावार का बोलत नाही? असा ही प्रश्न उपस्थित केला.

गुजरातच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी आज अंतिम दिवस आहे.  मोदीही आज सी प्लेनमधून प्रचार करत आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधींनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी मोदींवर सडकून टीका केली. २२ वर्षात गुजरातमध्ये फक्त मोदी  आणि रूपाणी सारख्यांचंच भलं झालं. निवडक लोकांचाच विकास झाला.  असं म्हणत गुजरात विकास मॉडेलवर त्यांनी ताशेरे ओढले. तसंच शैक्षणिक संस्थांच्या खाजगीकरणावर टीका  करण्यात आली. या सगळ्यात त्यांच्या मंदिर प्रवेशाचा विषयावरही ते बोलले. ‘मी आधीपासूनच मंदिरात जातो’ असं उत्तरही त्यांनी विरोधकांना दिलं. तसंच युवकांच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केलं. गुजरातची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. १४ तारखेला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. तसंच १८ तारखेला निकाल आहे. त्यामुळे आता गुजरातमध्ये खरच काँग्रेस जिंकतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments