Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeदेश'बँक सक्षम, खातेदारांनी राहावे निश्चिंत

‘बँक सक्षम, खातेदारांनी राहावे निश्चिंत

नवी दिल्ली: आम्ही कोणत्याही चुकीच्या गोष्टीला खतपाणी घालणार नाही. आम्हाला थोडा वेळ द्या, बँक पूर्ण क्षमतेने दोषींवर कारवाई करत आहे, ग्राहक असो वा कर्मचारी गैरव्यवहार करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करणार असल्याचे आज पंजाब नॅशनल बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं. नवी दिल्ली येथे आज पंजाब नॅशनल बँकचे एमडी सुनिल मेहता यांनी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली. 

सार्वजनिक क्षेत्रातील दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत ११,५०० कोटी रुपयांचा महाघोटाळा समोर आला आहे. घोटाळ्यात संशयित असलेले बडे व प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी व अन्य तिघे देश सोडून फरार झाले. पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रिच कँडी शाखेत हा घोटाळा झाल्याचे काल उघड झाले. हिरे व्यापारी नीरव मोदीने आपल्या मित्रांच्या सहाय्यानं पँजाब नॅशनल बँकेला हा गंडा घातल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आज शेअर बाजारात बँकेचे शेअर जोरदार कोसळले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments