Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeदेशभाजपाला लक्ष्मी पावली; वार्षिक १०३४ कोटी रुपये उत्पन्न!

भाजपाला लक्ष्मी पावली; वार्षिक १०३४ कोटी रुपये उत्पन्न!

bjpमहत्वाचे…
१. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेचा सात राष्ट्रीय पक्षांचा अहवाल
२. भाजपाचे एक वर्षात उत्पन्न तब्बल ८१ टक्क्यांनी वाढले
३. काँग्रेसच्या उत्पन्नात १४ टक्क्यांची घट


दिल्ली: देशातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष म्हणून भाजपाने बाजी मारली.भाजपाला लक्ष्मी दर्शन प्राप्त झाले यावर शिक्कामोर्तब झाले. एका अहवालातून भाजपाच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली. भाजपाचे एक वर्षात उत्पन्न तब्बल ८१ टक्क्यांनी वाढले. तर दुसरीकडे काँग्रेसच्या उत्पन्नात १४ टक्क्यांची घट झाली.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने सात राष्ट्रीय पक्षांचा अहवाल मंगळवारी जाहीर केला. भाजपा, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय- एम, कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, तृणमूल काँग्रेस या पक्षांचा यात समावेश आहे. या वर्षभरात या पक्षांचे उत्पन्न १, ५५७ कोटी रुपये होते. तर खर्च १,२२८ कोटी रुपये इतके होते. यात उत्पन्न म्हणजे राजकीय पक्षांना मिळणारा निधी आणि देणग्यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाला पक्षांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. भाजपाचे २०१६- १७ मधील उत्पन्न तब्बल ८१. १८ टक्क्यांनी वाढले आहे. २०१५- १६ च्या तुलनेत २०१६- १७ मध्ये भाजपाचे उत्पन्न ४६३.४१ कोटी रुपयांची वाढले. २०१५- १६ मध्ये भाजपाचे उत्पन्न ५७०. ८६ कोटी रुपये इतके होते. तर हेच प्रमाण २०१६- १७ मध्ये थेट १०३४. २७ कोटी रुपयांवर पोहोचले. काँग्रेसच्या उत्पन्नात मात्र घट झाली आहे. काँग्रेसचे उत्पन्न १४ टक्क्यांनी घटले. काँग्रेसचे उत्पन्न २०१५-१६ मध्ये २६१. ५६ कोटी होते. ते आता २२५. ३६ कोटींवर आले आहे.

भाजपाने निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार २०१६- १७ या वर्षात भाजपाचे ७१०. ५७ कोटी रुपये खर्च झाले. तर काँग्रेसचे ३२१. ६६ कोटी रुपये खर्च झाले. विशेष म्हणजे काँग्रेसचे उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण जास्त होते. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या एकूण देणग्यांपैकी ७४. ९८ टक्के देणग्या या ऐच्छिक होत्या. तर १२८. ६० कोटी रुपये हे पक्षांना बँकेतील व्याजातून मिळाले आहेत. राजकीय पक्षांनी ३० ऑक्टोबर २०१७ पर्यंत ऑडिट रिपॉर्ट सादर करणे बंधनकारक असते. मात्र, भाजपाने ८ फेब्रुवारी आणि काँग्रेसने १९ मार्च रोजी रिपोर्ट सादर केले. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीआय हे चारही गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने रिपोर्ट सादर करण्यास विलंब करत असल्याचे एडीआरच्या अहवालात म्हटले आहे.

या सात पक्षांचा अहवाल……

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने भाजपा, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय-एम,कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडिया,तृणमूल काँग्रेस या सात पक्षांचा अहवाज जाहीर केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments