Friday, July 19, 2024
HomeदेशAssembly Elections: पाच राज्यांमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर; वाचा एका क्लिकवर

Assembly Elections: पाच राज्यांमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर; वाचा एका क्लिकवर

assembly-elections-in-five-states-ec-announces-poll-schedule-for-west-bengal-kerala-tamil-nadu-assam-puducherry
assembly-elections-in-five-states-ec-announces-poll-schedule-for-west-bengal-kerala-tamil-nadu-assam-puducherry

नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने शुक्रवारी चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश (पुदुचेरी) मधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. राजकीय दृष्टया संवेदनशील असलेल्या पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात तर आसाममध्ये तीन फेजमध्ये मतदान होईल. मतदान प्रक्रिया २७ मार्चला सुरु होईल. तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीमध्ये एकाच टप्प्यात सहा एप्रिलला मतदान होणार आहे. सर्व राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांचे निकाल दोन मे रोजी जाहीर होतील.

“एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. १८.६८ कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. २.७ लाख मतदान केंद्र असणार आहेत” अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या सर्वाधिक २९४, तामिळनाडूत २३४, केरळमध्ये १४०, आसाममध्ये १२६ आणि पुदुचेरीत ३० विधानसभा जागांसाठी मतदान होईल. नोव्हेंबर २०२० मध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर आता करोनाकाळात या पाच राज्यांमध्ये निवडणूक होत आहे.

पश्चिम बंगाल निवडणूक कार्यक्रम ( एकूण २९४ जागा)
पश्चिम बंगालमध्ये आठ फेजमध्ये मतदान होणार आहे.

या पाच राज्यांपैकी सर्वाधिक चर्चा असलेली व अवघ्या देशाचे लक्ष लागलेली पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक तब्बल आठ टप्प्यात होणार आहे. यानुसार पहिला टप्प्यातील मतदान – २७ मार्च, दुसरा टप्पा – १ एप्रिल, तिसरा टप्पा- ६ एप्रिल, चौथा टप्पा – १० एप्रिल, पाचवा टप्पा १७ एप्रिल, सहावा टप्पा – २२ एप्रिल, सातवा टप्पा – २६ एप्रिल व आठवा टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे.

आसाम निवडणूक कार्यक्रम
आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान होईल.
पहिल्या फेजमध्ये २७ मार्चला, त्यानंतर एक एप्रिल आणि सहा एप्रिलला शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल.

पुदुचेरी निवडणूक कार्यक्रम (३० जागा)
केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरीमध्ये एका फेजमध्ये निवडणूक होईल.
अधिसूचना जारी होणार – १२ मार्चला
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – १९ मार्च
उमेदवारी अर्जाची छाननी – २० मार्च
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – २२ मार्च
केरळमध्ये मतदान – सहा एप्रिल
मतमोजणी – दोन मे

तामिळनाडूचा निवडणूक कार्यक्रम (२३४ जागा)
तामिळनाडूत विधानसभेच्या २३४ जागांसाठी एका फेजमध्ये मतदान होईल.
अधिसूचना जारी होणार – १२ मार्चला
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – १९ मार्च
उमेदवारी अर्जाची छाननी – २० मार्च
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – २२ मार्च
केरळमध्ये मतदान – सहा एप्रिल
मतमोजणी – दोन मे

केरळचा निवडणूक कार्यक्रम (१४० जागा)
अधिसूचना जारी होणार – १२ मार्चला
उमेदवारी अर्जाची छाननी – २० मार्च
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – २२ मार्च
केरळमध्ये मतदान – सहा एप्रिल
मतमोजणी – दोन मे

कोरोनाकाळात या निवडणुका होत असल्याने प्रचारासाठी काही मार्गदर्शकतत्त्वे आखण्यात आली आहेत.
दारोदार प्रचाराची उमेदवारासह फक्त पाच कार्यकर्त्यांना परवानगी असेल.
रोड शो ला परवानगी देण्यात आली आहे.
संशयित कोविड रुग्णासाठी स्वतंत्र नियम असतील.
निवडणूक अधिकार्‍यांचे लसीकरण झालेले असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments