Placeholder canvas
Tuesday, April 30, 2024
Homeदेशअरुण जेटली यांना मूत्रपिंड विकार!

अरुण जेटली यांना मूत्रपिंड विकार!

Arun Jaitleyकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना मूत्रपिंड विकाराने ग्रासले असून त्यांनी आपले सर्व परदेश दौरे तसेच सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. विषाणूसंसर्ग टाळण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना हा सल्ला दिल्याचे समजते.

जेटली यांच्या प्रकृतीची तपासणी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात झाली असून त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. माहितगार गोटातून मिळालेल्या माहितीनुसार मूत्रपिंड दात्याशी संबंधित प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.

दीर्घ मधुमेहामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळेच हा विकार उद्भवल्याचा तर्क आहे. याबाबत अधिकृत दुजोरा मात्र देण्यात आलेला नाही. मोदी सरकार सत्तेत येताच २०१४मध्ये ही शस्त्रक्रिया झाली होती. मात्र त्यात गुंतागुंत उद्भवल्याने त्यांना तातडीने आयुर्विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments