Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeदेशतब्बल ९४ कोटींची मालमत्ता कर्नाटक निवडणूक आयोगानं जप्त केली

तब्बल ९४ कोटींची मालमत्ता कर्नाटक निवडणूक आयोगानं जप्त केली

बंगळुरू : निवडणुका म्हटलकी तीथे प्रत्येक उमेदवार हा प्रत्येक नागरिकाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांना  आकर्षित करण्यासाठी विविध आमिषांचा अक्षरशः महापूर आला होता… दारू, गाड्या, साड्या, धोतरं, भांडीकुंडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू अशी तब्बल ९४ कोटी रूपयांची मालमत्ता यंदा निवडणूक आयोगानं जप्त केली. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा जप्त केलेल्या मालमत्तेत आठ पटीनं वाढ झालीय. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालाय. कर्नाटकात सरासरी ७० टक्के मतदान झालंय.  सकाळपासूनच मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा पाहायला मिळत होत्या.  जातीय आणि धार्मिक मुद्द्यावरुन ढवळून निघालेल्या कर्नाटकची जनता कुणाला कौर देणार याचीच आता साऱ्या देशाला उत्सुकता लागलीय. गेल्या वेळीही ७० टक्के मतदान  झालं होतं. आणि कर्नाटकाच्या जनतेनं काँग्रेसला कौल दिला होता. मात्र आता तेवढच मतदान झाल्यामुळे कुणाला कर्नाटकची जनता सत्तेची संधी देणार याबाबत उत्सुकता लागलीय. विधानसभेच्या 222 जागांसाठी  मतदान घेण्यात आलं. दोन जागांवरील मतदान पुढे ढकलण्यात आलंय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments