Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeदेशयेडियुरप्पा सगळ्यात भ्रष्ट! अमित शहा योग्यच बोलले; राहुल गांधींचा टोमणा

येडियुरप्पा सगळ्यात भ्रष्ट! अमित शहा योग्यच बोलले; राहुल गांधींचा टोमणा

Rahul Gandhi, Congressमहत्वाचे…
१. ट्विटरवरून भाजपाविरोधात खोचक टोमणा
२. शेजारी बसलेल्या त्यांच्या सहकाऱ्याने त्यांना चूक लक्षात आणून दिली
३. सोशल मीडियावर शहांच्या व्हिडिओचीच चर्चा


कर्नाटक: कर्नाटक विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अमित शहांची जीभ घसरली. भ्रष्टाचारासाठी कोणत्या सरकारला बक्षीस द्यायचे असेल तर ते येडियुरप्पा सरकारला द्यायला हवे असे त्यांनी म्हटले. तेवढ्यात त्यांच्या शेजारी बसलेल्या त्यांच्या सहकाऱ्याने त्यांना चूक लक्षात आणून दिली मग अमित शहांनी सिद्धरामय्यांचे नाव घेत ते सर्वात भ्रष्टाचारी असल्याचे म्हटले. मात्र अमित शहांची जीभ घसरली त्यावरच ट्विट करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला.


राहुल गांधींचा टोमणा

भाजपाच्या आयटी सेलने कर्नाटकच्या निवडणुकांच्या आणि निकालाच्या तारखा जाहीर केल्या. आमच्या टॉप सिक्रेट निवडणूक प्रचाराची झलक तुम्हाला आज बघायला मिळाली. अमित शहा यांचा व्हायरल व्हिडिओ हे आम्हाला मिळालेले गिफ्ट आहे असे मानतो असेही राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अमित शहा म्हणतात सर्वात जास्त भ्रष्टाचार झाला तो येडियुरप्पांच्या काळात. त्यांचे हे वक्तव्य योग्य आहे असेही राहुल गांधींनी म्हटले आहे.

कर्नाटकमध्ये एकाच टप्प्यात १२ मे रोजी मतदान होणार असून १५ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. काँग्रेसच्या हातात असलेल्या मोजक्या राज्यांमध्ये कर्नाटक असून ते जिंकण्यासाठी भाजपा जीवाची बाजी लावणार असल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत आज घडल्या तशा प्रत्येक चुका उचलून धरण्यास काँग्रेस उत्सुक असेल हे ही दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments