Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेश'आप'चे राज्यसभेसाठी तीन नाव निश्चत!

‘आप’चे राज्यसभेसाठी तीन नाव निश्चत!

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने (आप)ने राज्यसभेवर पाठविण्यात येणाऱ्या तीन उमेदवारांची नावे नक्की केली आहेत. आपने त्यांच्या कोट्यातून संजय सिंह, नवीन गुप्ता आणि सुशील गुप्ता यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला असून राज्यसभेच्या जागेसाठी प्रमुख दावेदार असलेल्या कुमार विश्वास यांचा पत्ता कापला आहे. त्यामुळे कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्याविरोधात बंड पुकारले आहे.

राज्यसभेच्या तीन जागांसाठी उमेदवार ठरविण्याचा आज अंतिम दिवस होता. त्यानुसार आपच्या आठ सदस्यांच्या समितीने या तीन नावांवर शिक्कामोर्तब केले. पक्षाचे संयोजक, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे दोघेही दिल्ली बाहेर होते. त्यामुळे समितीला कोणताच निर्णय घेता आला नव्हता. हे दोन्ही नेते दिल्लीत आल्याने आज केजरीवाल यांच्या घरी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
प्रत्येक वेळेस मी खरं बोललो. विविध प्रश्नांवर सातत्याने बोलत होतो, त्याचंच मला हे फळ मिळाल्याचं सांगत कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्या विरोधात बंड केलं. ज्यांचा चळवळीशी काहीही संबंध नव्हता, त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात येत आहे. गेल्या १२ वर्षांपासून चळवळीत घाम गाळणाऱ्यांना आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना पदापासून दूर ठेवलं जात आहे. आम्ही पक्ष वाढवला त्याचंच हे फळ असल्याचा टोलाही कुमार विश्वास यांनी लगावला. दरम्यान, शेवटच्या क्षणी राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावाचा खुलासा करण्याचा निर्णय आपने घेतला आहे. येत्या ५ जानेवारी रोजी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments