Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशआदित्य ठाकरे – राहुल गांधींमध्ये दिल्लीत खलबतं

आदित्य ठाकरे – राहुल गांधींमध्ये दिल्लीत खलबतं

Aaditya Thackeray ,Rahul Gandhi, maha vikas aghadi, shiv sena, congress, maharashtraनवी दिल्ली : महाराष्ट्र विकास आघाडीतील पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी दिल्लीत भेट घेतली. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रथमच राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये काय चर्चा झाली याचा तपशील कळू शकला नाही.

महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी – काँग्रेस आणि शिवसेना महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर तिन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये जवळीकता वाढली आहे. विशेष म्हणजे शिवसेना खासदारांनीही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींशी भेट घेतली होती. आदित्य ठाकरे हे दोन दिवस दिल्ली दौ-यावर आहेत. विशेष म्हणजे राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचे आमंत्रण देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्या वेळी आदित्य यांनी राहुल गांधी यांची भेट झाली नव्हती.

आदित्य यांची ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आदित्य ठाकरेंनी राज्यातील आणि देशातील विविध विषयांवर चर्चा केली अशीही माहिती समोर येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments