Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेश'पेड सेक्स'साठीही आता आधार कार्ड!

‘पेड सेक्स’साठीही आता आधार कार्ड!

पणजी – आधार कार्डची सक्ती आता फक्त बँका आणि मोबाईल सीम कार्डपूर्तीच मर्यादीत राहिली नाही. गोव्यामध्ये तर देहविक्रीच्या व्यवसायातील दलालही ग्राहकांना आधार कार्डची सक्ती करत आहेत. दिल्लीतील पाच तरुणांनी याबाबत खुलासा केला.

आपल्या मित्राच्या बॅचलर पार्टीसाठी हे तरूण गोव्यामध्ये आले होते. यावेळी त्यांनी एका हॉटेलमध्ये त्यांच्या संपर्कातील एका दलालाशी पार्टीसाठी पाच मुलींची चौकशी केली. यानंतर या दलालाने या तरुणांच्या मोबाईल नंबरची तपासणी केली. मोबाईल नंबर दिल्लीचा असल्याचे समजल्यावर या दलालाने या तरुणांकडे आधार कार्डचे फोटो व्हॉट्स अॅपवर मागवले. तसेच, ज्या हॉटेलमध्ये तरूण थांबले होते त्या हॉटेलच्या टॅगसह रुमच्या चाव्यांचा फोटोही या दलालाने मागितला.
यानंतर या गोंधळलेल्या तरुणांनी या दलालाच्या आज्ञांचे पालन केले. सुरक्षेच्या कारणास्तव या दलालाकडून या तरुणांची तसेच हॉटेल परिसराची संपूर्ण तपासणी करण्यात आली. ग्राहक पोलीस आहेत की नाही, तसेच ग्राहकापासून काही धोका तर नाही यासाठी ही संपूर्ण तपासणी करण्यात आली. या व्यवसायातील दलाल पोलिसांच्या छाप्यापासून वाचण्यासाठी आधारकार्ड घेऊन तपासणी करतात, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments