Tuesday, November 5, 2024
Homeदेश"एक आँसू भी हुकूमत के लिए ख़तरा है'', - राहुल गांधी

“एक आँसू भी हुकूमत के लिए ख़तरा है”, – राहुल गांधी

नवी दिल्ली – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नोटाबंदी वरुन पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी शायरीतून नरेंद्र मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयावर निशाणा साधला आहे. ‘एक आँसू भी हुकूमत के लिए ख़तरा है, तुमने देखा नहीं आँखों का समुंदर होना।’, असा इशारा देत त्यांनी शायरीतून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

शायरीद्वारे मोदी सरकारवर टीका करताना राहुल गांधी यांनी एका रडणा-या वृद्ध व्यक्तीचा फोटोदेखील ट्विट केला आहे. तसेच, ”सरकारची नोटांबदी ही राष्ट्रीय आपत्ती आहे नोटाबंदी ही एक शोकांतिका असून पंतप्रधानांच्या अविचारी निर्णयामुळे देशातील लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. नोटाबंदीनं उद्धवस्त झालेल्यांच्या पाठीशी काँग्रेस खंबीरपणे उभे आहे”, असेही ते म्हणालेत. तर, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त ट्विट करत जनतेचे आभार मानले आहेत. काळ्या पैशाविरोधातील मोहीमेला साथ दिल्याबद्दल जनतेचे आभार, असे ट्विट त्यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होत असून, त्यानिमित्ताने काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी ८ नोव्हेंबर हा काळा दिवस पाळण्याचे ठरविले आहे, तर सत्ताधारी भाजपाने काळा पैसाविरोधी दिन म्हणून तो साजरा करण्याचे ठरवले आहे. आज राज्याराज्यात केंद्रीय मंत्री नोटाबंदीचे महत्व समजावून सांगणार आहेत.

सोशल मीडियावर नोटाबंदीवरुन मोदी सरकारला केलं जातंय लक्ष
८ नोव्हेंबर  ही तारीख जसजशी जवळ येते, त्याप्रमाणे आता लवकरच नवा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर करतील, असे मेसेज फिरत आहेत. याशिवाय, मोदींच्या भाषणाची ‘मित्रों’ ही शैलीही ट्रेंडमध्ये आहे. त्या दिवसाची आठवण करून देणारी ‘तुमको भूला ना पायेंगे’ या आशयाची पोस्ट व्हायरल झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments