Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशधक्कादायक : २७६ भारतीयांना कोरोनाची लागण!

धक्कादायक : २७६ भारतीयांना कोरोनाची लागण!

Coronavirus patients in Mumbai, coronavirus, mumbai coronavirus, maharashtra, uddhav thackerayनवी दिल्ली : कोरोनाने जगभरात हैदोस घातला आहे. परदेशात असलेल्या २७६ भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ईराणमध्ये सर्वाधिक करोनाग्रस्त आहेत. अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

ईराणमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये २५५ भारतीय कोरोनाग्रस्त आहेत. या व्यतिरिक्त हाँगकाँगमध्ये १ भारतीय, इटलीत ५, कुवैत, रवांडा आणि श्रीलंकेत प्रत्येकी १ आणि सौदी अरबमध्ये १२ भारतीयांना करोनाची लागण झाली आहे. या पूर्वी ईराणमधील तेहरान येथून एकूण २०१ भारतीयांना बुधवारी विशेष विमानाने भारतात परत आणले गेले. आतापर्यंत ईराणमधून एकूण ५०९ भारतीयांना परत आणले गेले आहे. या सर्व लोकांना राजस्थान येथील जैसलमेर येथे क्वारंटाइनमध्ये ठेवले जाणार आहे.

भारतात आतापर्यंत कोरोनाचे एकूण १५१ रुग्ण…

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात आतापर्यंत कोरोनाचे एकूण १५१ रुग्ण आढळले आहेत. बेंगळुरूमध्येही करोनाचे २ नवे रुग्ण सापडले असून भारतात आतापर्यंत ३ लोकांचे बळी गेले आहेत. १३ लोकांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

जगभरात इतक्या लोकांना आहे कोरोना…

करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या लक्षात घेता चीनमध्ये आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चीनमध्ये एकूण ३२३७ लोकांचा बळी गेला आहे. तर, इटलीत मृतांचा आकडा जलदगतीने वाढतो आहे. या व्यतिरिक्त, ईराणमध्ये ९८८, स्पेनमध्ये ५३३, फ्रान्समध्ये १७५, अमेरिकेत ११२, ब्रिटनमध्ये ७१, दक्षिण कोरियात ८४, नेदरलँडमध्ये ४३, जपानमध्ये २९, स्वित्झर्लंडमध्ये २७, भारतात ३, जर्मनीत २६, फिलिपाईन्समध्ये १४ आणि इराकमध्ये ११ लोकांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढही होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments