Thursday, May 2, 2024
Homeदेशगुजरातमध्ये भीषण अपघात २५ जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये भीषण अपघात २५ जणांचा मृत्यू

gujarat,accidentगुजरात: भावनगर इथं ट्रक नाल्यात पलटून झालेल्या भीषण अपघातात, तब्बल २५ जणांचा मृत्यू झाला.  तर अनेक जण जखमी आहेत. हा ट्रक एका नाल्यात पडला. आज पहाटे भावनगर-राजकोट महामार्गावर ही दुर्घटना घडली. चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट नाल्यात कोसळला. या भीषण दुर्घटनेत अनेकांनी जागीच प्राण गमावले.

ट्रकमध्ये जवळपास ६० जण होते आणि ते सगळे लग्नाचे वऱ्हाडी होते. जखमींवर उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments