Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeदेशविजय रुपाणी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी पोहोचले!

विजय रुपाणी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी पोहोचले!

गांधीनगर – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, अनेक केंद्रीय मंत्र्यांसह एनडीएशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री देखील सहभागी झाले होते. मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांच्यासह २० मंत्र्यांनी शपथ घेतली. यात ६ पाटीदार चेहरे, ६ ओबीसी, २ राजपूत, ३ आदिवासी, १ दलित, १ ब्राम्हण आणि एका जैन चेहऱ्यांचा समावेश आहे.

गांधीनगरच्या सचिवालय मैदानात आयोजित गुजरात सरकारच्या या भव्य शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला, बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, रविशंकर प्रसाद, राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह, जे.पी. नड्डा, अनंत कुमार, अरुण जेटली यांच्यासह अनेक साधू-संतांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments