Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशलालू प्रसाद यांचा धक्का: मोठ्या बहिणीचे निधन

लालू प्रसाद यांचा धक्का: मोठ्या बहिणीचे निधन

रांची राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी साडेतीन वर्षांची शिक्षा झाल्याच्या धक्क्याने लालूंच्या मोठ्या  बहिणीचे रविवारी निधन झाले. गंगोत्री देवी असे त्यांचे नाव असून त्यांच्या निधनामुळे यादव कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, लालूप्रसाद यादव यांना शिक्षा मिळाल्यामुळे त्यांना धक्का बसल्याने त्यांचे निधन झाले, असे यादव कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

बहिणीच्या अंत्यसंस्कारात सामील होण्यासाठी लालूंचे वकील त्यांना पॅरोल मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गंगोत्री देवी या त्यांच्या एकुलत्या एक बहीण होत्या. गंगोत्री देवी या पाटणा येथील व्हेटर्नरी कॉलेजमधील सर्व्हंट क्वार्टरमध्ये राहत होत्या. लालूप्रसाद यादव हे १९९० मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत याच ठिकाणाहून सरकार चालवत होते. गंगोत्री देवी यांच्या तीन मुलांपैकी एकाचा मृत्यू झालेला आहे. तर उर्वरित दोघे बिहार पोलीस आणि रेल्वेमध्ये नोकरीस आहेत. लालूप्रसाद यांच्या सहा भावांमध्ये त्या एकुलत्या एक होत्या. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारीही होत्या.

दरम्यान, चारा घोटाळ्याप्रकरणी शनिवारी लालूप्रसाद यांच्या शिक्षेची सुनावणी झाली. त्यांना साडेतीन वर्षांची शिक्षा झाली. सीबीआय न्यायालयाचे न्या. शिशुपाल सिंह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही शिक्षा सुनावली. लालूप्रसाद यांना आता तुरूंगवासादरम्यान माळीकाम करावे लागणार आहे. रांचीतील बिरसा मुंडा तुरूंगात लालूप्रसाद यादव एक कैदी म्हणून काम करतील आणि त्याचे त्यांना पैसेही मिळतील. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार या कामापोटी लालूप्रसाद यांना दररोज ९३ रूपये मिळतील.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments