Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeदेशराज्यसभेत सचिन पहिल्यांदाच भाषणासाठी उभा राहिला पण…

राज्यसभेत सचिन पहिल्यांदाच भाषणासाठी उभा राहिला पण…

नवी दिल्ली : खासदार सचिन तेंडुलकर आज राज्यसभेत उपस्थित होता. राईट टू प्लेया विषयावर सचिन आपलं आज मत मांडणार होता, मात्र विरोधकांच्या गदारोळात सचिनला बोलण्याची संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे खासदार झाल्यापासून सचिन पहिल्यांदाच राज्यसभेत बोलणार होता. परंतु गोंधळामुळे त्याला बोलताच आले नाही.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर राज्यसभेचा खासदार आहे. सचिन खूप दिवसांनंतर राज्यसभेत बोलणार होता. ‘राईट टू प्ले’ असा त्याचा विषय होता. त्यामुळे सचिन काय बोलणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती. यावेळी, गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंह यांचं नाव घेत आरोप केले होते. त्याप्रकरणी काँग्रेसचे खासदार आज राज्यसभेत आक्रमक झाले होते आणि मोदींनी माफी मागावी, अशी मागणी करत होते. या संपूर्ण गदारोळात सचिन तेंडुलकरला बोलताही आले नाही.
‘राईट टू प्ले’वर बोलण्यासाठी सचिन राज्यसभेत उभा राहिला होता. मात्र काँग्रेस खासदारांच्या गोंधळाचा आवाज इतका होता की, त्याला व्यत्यय येत होता. त्यामुळे सचिन काही वेळ शांतपणे उभाच राहिला. त्यानंतरही काँग्रेस खासदार गप्प राहताना दिसत नाही, हे लक्षात आल्यावर राज्यसभेचे अध्यक्ष असलेले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेचं कामकाज उद्या सकाळी ११ वाजेपर्यतं तहकूब करण्याची घोषणा केली. एकंदरीत काँग्रेस खासदारांच्या घोषणाबाजी आणि त्यातून निर्माण झालेल्या प्रचंड गोंधळामुळे सचिन तेंडुलकरला भाषण काही करता आलं नाही. त्यामुळे अर्थातच ‘राईट टू प्ले’वर सचिनला आपलं मतही मांडता आलं नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments