Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशमुस्लिम २०२४ नंतर भारतात राहू शकणार नाहीत!

मुस्लिम २०२४ नंतर भारतात राहू शकणार नाहीत!

लखनौ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला २०२४ मध्ये १०० वर्ष पूर्ण होत आहे. तेव्हा संपूर्ण भारत हिंदू राष्ट्र असेल. तसेच त्यावेळी जे मुस्लिम हिंदू संस्कृतीचा अवलंब करतील तेच भारतात राहू शकतील, असे वादग्रस्त विधान भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले आहे. सिंह हे बलिया जिल्ह्यातील बैरिया मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

आमदार सुरेंद्र सिंह यांनी मुस्लिमांच्या देशभक्तीवर शंका उपस्थित केली आहे. देशभक्त मुस्लिमांची संख्या भारतात कमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सिंह यांच्या वादग्रस्त विधानानंतर अडचणीत आलेल्या भाजपने सारवासारव केली आहे. सिंह यांचे ते वैयक्तिक मत असल्याचे पक्ष प्रवक्त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सर्वसमावेशकतेचे धोरण आहे.’सबका साथ, सबका विकास’ या धोरणानुसार सरकार काम करत असल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments