Sunday, May 19, 2024
Homeदेशमुख्यमंत्री आदित्यनाथांशी प्रतिकात्मक विवाह, सर्व महिलांवर राजद्रोहाचा गुन्हा!

मुख्यमंत्री आदित्यनाथांशी प्रतिकात्मक विवाह, सर्व महिलांवर राजद्रोहाचा गुन्हा!

लखनऊ – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात प्रतिकात्मक विवाह करणाऱ्या महिलेसह इतर उपस्थित महिलांवर पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने या महिलेची रवानगी कोठडीत केली आहे.  नीतू सिंह असे या महिलेचे नाव असून ती अंगणवाडी महिला कर्मचारी संघाची जिल्हाध्यक्ष आहे. संघटनेच्या अन्य कार्यकर्त्यांसमवेत नीतू सिंह या आंदोलन करत होत्या. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवावे, अशी त्यांची मागणी होती.

नीतू सिंह यांनी सोमवारी(४ डिसेंबर) योगी आदित्यनाथ यांच्याशी प्रतिकात्मक विवाह केला होता. आंदोलनाच्या ठिकाणी त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या छायाचित्राला हार घातला, तर नवरा म्हणून कल्पना नावाच्या कार्यकर्तीने त्यांना हार घातला होता. तसेच त्यांनी संतोषी मंदिरात जाऊन इच्छा पूर्ण व्हावी, अशी प्रार्थना केली होती. योगी यांनी मला पत्नी म्हणून ठेवावे किंवा भरपाई म्हणून सर्व कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपयांचे मानधन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर नैमिषारण्य येथे शुक्रवारीत्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

शनिवारी न्यायालयाने नीतू व अन्य कर्मचाऱ्यांना कोठडीत पाठवायचे आदेश दिले. कोठडीत पाठविलेल्या सर्व महिलांना राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. या खटल्याची सुनावणी ११ डिसेंबर रोजी होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments