Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeदेशभीमा – कोरेगाव- नरेंद्र मोदींनी निवेदन देण्याची खासदार मल्लिकार्जून खर्गे यांची...

भीमा – कोरेगाव- नरेंद्र मोदींनी निवेदन देण्याची खासदार मल्लिकार्जून खर्गे यांची मागणी

नवी दिल्ली – भीमा – कोरेगाव घटनेचे संतप्त पडसाद महाराष्ट्रात उमटत असताना लोकसभेतही या प्रकरणावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खर्गे यांनी भीमाकोरेगाव हिंसेमागे हिंदुत्ववादी संघटना आणि आरएसएसचा हात असल्याचा आरोप केला आहे. सोबतच जिथे जिथे भाजपाची सत्ता आहे तिथे दलितांवर अत्याचार होतात असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. मल्लिकार्जून खर्गे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावर लोकसभेत निवेदन देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी मौनी बाबाअसल्याचा टोलाही लगावला. 

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी यावेळी गोंधळ करणा-या खासदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेवर राजकारण करु नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. दलितांचं भलंही नको, आणि राजकारणही करायचं आहे हे चालणार नाही असं सुमित्रा महाजन यांनी यावेळी सुनावलंस शिवाजीराव अढळराव पाटील यांनी या प्रकरणावर निवेदन देताना काही लोकांनी राजकारण करण्यासाठी, जातीय तेढ वाढवण्यासाठी हा प्रयत्न केला आहे असा आरोप केला. पोलीस परिस्थिती हाताळू शकत नसल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारला मदत पाठवावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments